लष्करी वाहन खोल दरीत कोसळले
वृत्तसंस्था/ लडाख
केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये लष्कराचा ट्रक खोल दरीत कोसळून 9 जवानांना प्राण गमवावे लागले. मृत सैनिकांमध्ये आठ सैनिक आणि एक जेसीओ (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर) यांचा समावेश आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात आले होते.
लडाखमधील लेहजवळ लष्कराच्या ट्रकला अपघात झाला आहे. लष्कराशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या ट्रकसोबत एक ऊग्णवाहिका आणि यूएसव्हीही जात होते. या सर्व वाहनांमध्ये लष्कराचे एकूण 34 जवान होते. लष्करी जवानांचा वाहनताफा कारू गॅरिसन येथून लेहजवळील कियारीकडे जात होता. शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजल्यानंतर लष्कराच्या ट्रकला कियारी शहरापासून 7 किमी अंतरावर अपघात झाल्याचे लडाखमधील संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले.









