प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Tourism News : कोल्हापूर जिल्हयातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटक व भाविकांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सन 2022-23 साठी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील 12 पर्यटन स्थळांच्या विकासाकरीता रु. 9 कोटी 23 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. गेली दोन वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
मंजूर पर्यटन स्थळामध्ये अर्जुनी, ता.कागल येथील गाव तलाव सुशोभीकरण व बगीचा विकसीत करण्यासाठी 1 कोटी रूपये, कौलगे ता. कागल येथील गाव तलाव सुशोभीकरण, अंबाबाई व भावेश्वरी मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 3 कोटी, दौलतवाडी, ता. कागल भैरवनाथ मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 1 कोटी, मौजे बेनक्रे, ता.कागल येथील विठ्ठलाई मंदिर पालखी मार्ग करण्यासाठी 50 लाख, गगनगिरी मठ,ता. गगनबावडा पर्यटन स्थळ विकसीत करण्यासाठी 50 लाख, कासारवाडी, ता.राधानगरी धबधबा पर्यटन स्थळ विकासीत करण्यासाठी 50 लाख, दुर्गमानवाड, ता.राधानगरी विठ्ठलाई मंदिर पर्यटन स्थळ विकसीत करण्यासाठी 23 लाख,मेतके, ता.कागल येथील बाळूमामा देवालय सुशोभीकरणासाठी 25 लाख,सिरसंगी,ता.आजरा गोठणदेव मंदिर रस्ता सुशोभीकरणासाठी 30 लाख,मौजे तुरंबे,ता. राधानगरी येथील गणेश मंदिर परिसर सुशोभीकरण व सभागृह बांधण्यासाठी 50 लाख,चाळोबा ता.आजरा पर्यटन स्थळ विकसीत करण्यासाठी 20 लाख,महालक्ष्मी मंदिर,गडहिंग्लज विकासीत करण्यासाठी 1 कोटी 25 लाख अशा एकूण 9 कोटी 23 लाख निधी मंजूर झाला आहे.
सदर प्रशासकीय मान्यता दिलेल्या 9 कोटी 23 लाख रकमेपैकी पहिल्या हप्त्यापोटी 1 कोटी 85 लक्ष इतका निधी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्याकडे वितरीत करण्यात आला असून या पर्यटन स्थळाच्या विकासामुळे पर्यटकासह भाविकांची चांगली सोय होणार आहे. सदरची पर्यटन स्थळे सर्व नागरिकांसाठी खुली ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर निधी मंजूरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोंढा व पालक मंत्री दीपक केसरकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले. लवकरच जिल्हयातील उर्वरीत पर्यटन स्थळाच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर करणार असल्याची ग्वाही खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









