आरटीआयद्वारे प्राप्त माहितीतून उघड
पणजी : गोवा मुक्तीदिनाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या केवळ समारोप सोहळ्यावरच तब्बल 9.25 कोटी ऊपये खर्च केल्याचे उघडकीस आले आहे. बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी हा खर्च करण्यात आला असल्याची माहिती आयरीश रॉड्रिगीश यांना आरटीआयच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. या सोहळ्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटचे काम वास्कोतील विन्सन ग्राफिक्स कंपनीला देण्यात आले होते. त्यासाठी त्यांना 8,91,16,612 ऊपये अदा करण्यात आले तर भाड्याने आणलेल्या 391 बसेससाठी 28,46,229 ऊपये फेडण्यात आले. त्याशिवाय स्टेडियमचे भाडे म्हणून क्रीडा प्राधिकरणाला 5,60,500 ऊपये देण्यात आले आहेत. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या महनीय पाहुण्यांसाठी आणलेल्या सोफा, खुर्च्या आदींच्या भाड्यापोटी 19.40 लाख ऊपये खर्च करण्यात आले. स्टेज सजावटीवर 1.87 कोटी, 600 व्हीआयपी आणि 7000 अन्य मान्यवर यांच्या चहापानावर अनुक्रमे 15 लाख आणि 14 ऊपये खर्च करण्यात आले. स्डेडियममध्ये बसविण्यासाठी आणलेल्या 16 एलईडी क्रीनच्या भाड्यावर 57 लाख 60 हजार ऊपये, जनरेटरच्या भाड्यासाठी 85 लाख, बांबोळी परिसरातील सर्व वीज खांबांवर जाहिरात फलक प्रदर्शित करण्यासाठी 13 लाख, 600 निमंत्रण पत्रिका छपाईसाठी 2.40 लाख, कार्पेट अंथरण्यासाठी 1.60 लाख, ध्वनीक्षेपक यंत्रणेवर 41 लाख 25 हजार, वीज रोषणाईवर 17 लाख, सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यावर 11 लाख खर्च करण्यात आले आहेत. केवळ 5.10 मिनिटांचा ऑडिओ व्हिज्युअल बनविण्यावर 8.67 लाख ऊपये खर्च करण्यात आले. त्याशिवाय प्रवेशद्वारावर कमान आणि स्टेडियमबाहेर लोकांना बसण्यासाठी मंडप आणि एलईडी क्रीन उभारण्यावर अनुक्रमे 34 लाख आणि 25 लाख ऊपये खर्च करण्यात आले आहेत. दरम्यान, अशाप्रकारे एखाद्या कार्यक्रमावर खर्च करणे ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे. यापूर्वीही गतवर्षी 28 मार्च रोजी झालेल्या मुख्यमंत्र्यी आणि आठ मंत्र्यांच्या केवळ 18 मिनिटांच्या शपथविधी सोहळ्यावर अशाच प्रकारे 5.59 कोटी ऊपये खर्च करण्यात आले होते. तेही कंत्राट विन्सन ग्राफिक्स यांनाच देण्यात आले होते, असे अॅड. रॉड्रिग्स यांनी म्हटले आहे.








