सातारा / प्रतिनिधी :
पुणे- बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. संबंधित रिलायन्सच्या ठेकेदाराने यंत्रणा मॅनेज केली असल्याने आवाज उठवूनही कामे केली जात नाहीत. त्यामुळे गुरुवार दि. 9 सप्टेंबर रोजी आनेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करत टोल नाका बंद पाडण्याचा इशारा रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, सर्वपक्षीय नेते यांनी या आंदोलनात सहभाग घेतला तर ते जनतेच्या हिताचे ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी गायकवाड म्हणाले, ठेकेदाराने सर्व राष्ट्रीय यंत्रणा मॅनेज केली आहे. शेजारच्या जिह्यातील कामे बंद आहेत, मग साताऱ्यात का सुरू आहेत. सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात येणार असून हा सामाजिक प्रश्न सुटला पाहिजे त्यांनी एकत्र यावे, कोणीही यावे. खड्डे भरेपर्यंत टोल बंद ठेवा, गेल्या चार दिवसात दहा हुन अधिक अपघात झाले आहेत. ठिकठिकाणी खड्डे आहेत, खडी, डबर ठेकेदारावर कारवाई करून टोल बंद करा, दोन दिवसात बैठक लावून निर्णय नाही झाला तर परिणाम होणार आहेत. मनुष्यवधाचे गुन्हे तात्काळ दाखल करा, आंदोलन करू भूमिका मान्य आहे त्यांनी बरोबर यावे, असे आवाहन त्यांनी केले.









