कुटुंबाची गरीबी दूर करण्यासाठी उचलले पाऊल
कमी वयात जेव्हा कुटुंबाच्या जबाबदारीचा भार खांद्यांवर पडतो, तेव्हा बालपण त्याखाली चिरडले जाते. 9 वर्षीय थाई किक बॉक्सर पोर्नपट्टारा पीचौराईची कथा काहीशी अशीच आहे. थायलंडमध्ये मुलं तसेच अल्पवयीनांसाठी बॉक्सिंग केवळ खेळ नव्हे तर गरीबीतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. याचमुळे 9 वर्षी ‘टाटा’ पुन्हा फायटिंग रिंगमध्ये उतरण्यास आतुर आहे. 5 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून कोरोना महामारीमुळे फाइट्स बंद झाल्या आहेत. हा चिमुकला बॉक्सर रिंगमध्ये लढून स्वतःच्या कुटुंबासाठी दोनवेळच्या जेवणाची सोय करतो. त्याने कमविलेल्या पैशातूनच त्याचे घर चालते.
आईला देतो पूर्ण कमाई
बॉक्सिंगमधून प्राप्त होणारी पूर्ण रक्कम हा मुष्टियोद्धा स्वतःच्या आईला देतो. बॉक्सर असल्याचा मला गर्व असून स्वतःच्या आईसाठी मी पैसा कमावत असल्याचे तो सांगतो. टाटाने अखेरची फाइट ऑक्टोबर महिन्यात केली होती. पण थायलंडमध्ये कोविडची दुसरी लाट उद्भवल्यावर सर्वकाही बंद झाले. मी बॉक्सिंग तसेच सरावर करू शकत नव्हतो. अशा स्थितीत आईला तिच्या कामात मदत करू लागल्याचे टाटाने सांगितले आहे.
16 वर्षीय बहिणही बॉक्सर
टाटा स्वतःची आई आणि 16 वर्षीय बहिण पुमरप्पीसोबत राहतो. त्याची बहिण देखील बॉक्सर तसेच राष्ट्रीय युवा संघाची सदस्या आहे. हे कुटुंब ‘टाटा’च्या कमाईवर निर्भर आहे. टाटा एक व्यावसायिक बॉक्सर होऊन आपल्याला गरीबीतून बाहेर काढणार अशी अपेक्षा त्यांना आहे. टाटा स्वतःची सर्व कमाई मलाच आणून देतो, पण कधीकधी फाइटनंतर काही खेळणी घेऊ का अशी विचारणाही करत असल्याची माहिती त्याची 40 वर्षीय आई सुरिपोर्न इम्पीयोंग यांनी दिली आहे.
अडचणींना तोंड द्यावे लागते
थायलंडमध्ये ‘चाइल्ड फाइट्स’ अत्यंत लोकप्रिय आहेत. व्यावसायिक बॉक्सिंग संघटनेच्या एका अनुमानानुसार येथे 3 लाख बॉक्सर 15 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहते. अल्पवयीनांसाठीच्या बॉक्सिंवर बंदी घालण्याची मागणी काही वैद्यकीय तज्ञ करत आहेत. बॉक्सिंगमुळे मुलांच्या शारीरिक विकासावर प्रभाव पडतो, तसेच त्यांना दिव्यांगत्व आणि बेन डॅमेज यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते असे त्यांचे म्हणणे आहे.
जीव देखील जातो रिंगमध्ये
सद्यकाळात मुलांच्या आईवडिलांच्या सहमतीनंतरच त्यांना फायटिंग रिंगमध्ये प्रवेश करता येतो. बॉक्सरला स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. चाइल्ड बॉक्सिंमध्ये खूप जखमा होत नाहीत असा दावा टाटाच्या आईने केला आहे. पण 2018 मधील एका स्पर्धेत 13 वर्षीय मुलाचा रिंगमध्ये ब्रेन हॅमरेजनंतर मृत्यू झाला होता.