मुंबई
10 पैकी 9 कंपन्यांचे बाजार भांडवल शेअर बाजारात मागच्या आठवडय़ात घसरल्याचे दिसले. या भारती एअरटेल ही एकमेव कंपनी मात्र नफ्यात होती. मागच्या आठवडय़ात 10 पैकी 9 कंपन्यांचे बाजार भांडवल 2 लाख 62 हजार 142 कोटी रुपयांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे. यात बजाज फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रिज यांना मोठा फटका बसला आहे. बजाज फायनान्सचे बाजार भांडवल 41 हजार 518 कोटींनी घसरून 4 लाख 10 हजार 670 कोटी रुपयांवर घसरले आहे.









