87 out of 92 voters exercised their right to vote at Banda Center in the Konkan Teachers Constituency Election
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आज बांदा केंद्रावर ९२ पैकी ८७ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावीला ९४.५६ टक्के मतदान झाले. बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे व महाविकास आघाडी व टीडीएफ, शिक्षकसेना व अन्य शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्यातथेट लढत होत आहे. बांदा येथील खेमराज प्रशाळेच्या मतदान केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या बूथवर भाजपा व बाळासाहेबांच्या शिवसेनेचेपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार बाळाराम पाटील यांचा बूथ लावण्यात आला होता त्यावर शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी सभापती प्रमोद कामत, शीतल राऊळ, गुरुनाथ पेडणेकर, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, माजी सरपंच मंदार कल्याणकर, वाफोलि उपसरपंच विनेश गवस, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर, गुरुनाथ सावंत,प्रवीण देसाई, शेर्ले ग्रामपंचायत सदस्य शामराव सावंत, न्यानेश्वर सावंत, आत्माराम गावडे, पांडुरंग नाटेकर, राजेश विरनोडकर , साहिल कल्याणकर आदी उपस्थित होते. तर महाविकास आघाडीच्या बुथवर लक्ष्मण पावसकर, लवू गावडे व सुप्रिया पाटील उपस्थित होते. बांदा केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले यांच्यासह याठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.
प्रतिनिधी
बांदा









