प्रतिनिधी, कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या उन्हाळी परीक्षा ऑफलाईन वस्तुनिष्ठ पध्दतीने घेण्यात आल्या. या परीक्षेमध्ये ओएमआरशीट व उत्तराचा गोल भरताना काही विद्यार्थ्यांनी संपूर्ण गोल भरला नसल्याने काही विद्यार्थ्यांचा निकाल अनुत्तीर्ण असा आला आहे. संबंधीत विद्यार्थ्यांनी फोटो कॉपीची मागणी केली आहे, त्यांना सोमवार 10 ऑक्टोबरपासून फोटोकॉपी देण्यास प्रारंभ केला आहे. तीन दिवसात 857 विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. परंतू काही विद्यार्थ्यांचे निकाल अनुत्तीर्ण तर परीक्षेला उपस्थित असूनही झिरो गुण किंवा अनुपस्थित असल्याचा निकाल आला आहे. तर काहींना पेपर लिहूनही कमी गुण मिळाल्याचा निकाल प्राप्त झाला आहे. संबंधीत विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीची मागणी केल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून फोटोकॉपीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. यासंदर्भातील परिपत्रक महाविद्यालयाला पाठवले असून ज्यांना फोटोकॉपी पाहिजे त्यांनी 100 रूपये भरून अर्ज भरावा. तर 200 रूपये भरून पुनःतपासणीसाठी अर्ज भरावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.
Previous Articleश्रीपंत महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाची अमाप उत्साहात सांगता
Next Article शहर-ग्रामीण बसप्रवाशांसाठी नवे प्लॅटफॉर्म खुले









