२८ नवीन नवोदय विद्यालये
दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी, केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पी एम स्कूल ऑफ रायसिंग इंडिया या योजनेंतर्गत विद्यमान शाळांना बळकट करण्यासाठी आणि देशातील १४,५०० हुन अधिक नवीन शाळा स्थापन करण्यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्यात आली.
या बैठकीत दोन अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या शिक्षण सुविधा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित निर्णय घेण्यात आले. केंद्र सरकारने देशभरात नवीन ८५ केंद्रिय विद्यालये सुरु करण्यात येणार आहे. तर २८ नवीन नवोदय विद्यालये सुरु करण्यासाठी मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. या केंद्रिय विद्यालयांपैकी महाराष्ट्रात तीन नवीन केंद्रिय विद्यालये सुरू होणार आहेत.
या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि उत्तेजक शिक्षण वातावरण तयार करणे, भौतिक पायाभूत सुविधा आणि संसाधन पुरवणे, विद्यार्थ्यांना व्यस्त, उत्पादक आणि योगदान देणारे नागरिक बनवण्यासाठी पोषक वातावरण देणे अशा अनेक उद्देशांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही योजना २०२२- २३ ते २०२६-२७ या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील १९ जिल्ह्यामध्ये ८५ नवीन शाळा उघडण्यात येणार आहेत. यापैकी जम्मू- काश्मीर मध्ये १३, मध्य प्रदेशमध्ये ११ सर्वाधिक विद्यालये सुरु होणार आहेत. तर राजस्थान मध्ये ९, ओडिसा मध्ये ८, आंध्रप्रदेश मध्ये ८, उत्तर प्रदेशमध्ये ५, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये प्रत्येकी ४, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्येक ३, झारखंड आणि तामिळनाडू मध्ये प्रत्येकी २ तर अरुणाचल प्रदेश, दिल्ली, केरळ आणि आसाम मध्ये प्रत्येकी १ विद्यालय सुरु करण्यात येणार आहेत.