मुलाने पूर्ण केली आईची इच्छा
जेव्हा मन तरुण असतं तेव्हा वय 80 पार झाले तरीही फारसा फरक पडत नाही. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील एका आजीची चित्रफित सोशल मीडियावर लोकप्रिय झाली होती. तर आता अमेरिकेतील एका 84 वर्षीय वृद्ध महिलेने ‘विमान उडवून’ लोकांना थक्क करून सोडले आहे. सोशल मीडियावर या महिलेची चित्रफिती व्हायरल झाली आहे.
आजाराविषयी कळल्यावर…
84 वर्षीय मायर्ता गेज यांनी आपण पार्किसंस आजाराने पीडित असल्याचे कळल्यावर जे काही स्वतःला आवडते ते सर्व काही करण्याचा निर्णय घेतला. विमानाचे उड्डाण करविणे हे त्यंच्या पसंतीच्या कामांपैकीच एक आहे.
तरुणपणी होत्या वैमानिक
मायर्ता यांनी पूर्वी वैमानिक म्हणून काम केले होते. अशा स्थितीत त्यांनी विमानाच्या कॉकपिटमध्ये पाऊल ठेवताच त्यांच्या सुंदर आणि रम्य आठवणी ताज्या झाल्या. आईला दैनंदिन कामे करताना मोठय़ा अडचणी येत होत्या. अशा स्थितीत कुटुंबाने त्यांच्या पसंतीच्या कामांची एक यादी तयार केली आणि सर्वांनी या कामांकरता आजीला मदत केल्याचे त्यांचे पुत्र एर्ल यांनी सांगितले आहे.
कुटुंबीयांकडून इच्छापूर्ती
अन्य गोष्टींप्रमाणेच आजींची विमान उड्डाण करण्याची इच्छाही पूर्ण झाली आहे. स्वतःच्या आईची विमानोड्डाणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी एर्ल यांनी कोडी मॅट्टियेलो या वैमानिकाशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांनी विमानातून विन्नेपेसाउकी सरोवर आणि माउंट केयरसर्जवरून एक स्मरणीय उड्डाण केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल
इतकेच नाही तर सहकारी वैमानिकाच्या मदतीने आजींनी आकाशात विमानाचे नियंत्रणही सांभाळले आहे. विमानाचे वैमानिक कोडी मॅट्टियेलो यांनी या सुंदर क्षणांची छायाचित्रे आणि चित्रफिती फेसबुकवर प्रसारित केलया आहेत. यात आजींना विमानाचे उड्डाण करविताना पाहिले जाऊ शकते. या पोस्टला आतापर्यंत सुमारे 3 हजार लाइक्स मिळाल्या आहेत.