धनगर समाजाच्या मंगोबा मंदिर सांस्कृतिक भवनाचा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते पायाभरणी शुभारंभ
प्रतिनिधी/जयसिंगपूर
माझा जडणघडणीमध्ये शिरोळ तालुक्यांमधील अनेक जाती-धर्मांच्या लोकांचे मोठे योगदान आहे. यामध्ये धनगर समाजाचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे, कोणीतरी पाठीशी असल्याशिवाय काहीतरी करता येत नाही, शिरोळ तालुक्यातील सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी मला आपले समजलं त्यामुळेच मी मंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो असे भावनिक उदगार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कोथळी येथे बोलताना काढले,
कोथळी ता. शिरोळ येथे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नामधून धनगर समाजाच्या मंगोबा मंदिर सांस्कृतिक भवन बांधकामासाठी राज्य शासनाच्या क वर्ग तिर्थक्षेत्र विकास निधी मधून 25 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सांस्कृतिक भवनाच्या पायाभरणी शुभारंभ प्रसंगी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.
धनगर समाज बांधवांच्यासाठी उभारण्यात येत असलेले हे सांस्कृतिक भवन समाजातील सर्व घटकांसाठी उपयोगी आणि फायदेशीर ठरणार असल्याचे यावेळी मंत्री यड्रावकर यांनी सांगितले. कोरोनाच्या लढाईमध्ये महाराष्ट्र शासन अतिशय आर्थिक संकटामधुन वाटचाल करीत असल्याचे सांगून इच्छा असून सुद्धा अपेक्षा इतका निधी तालुक्यातील विकास कामांसाठी खेचून आणता येऊ शकत नाही याबद्दलची खंत देखील व्यक्त केली.
कोरोनाच्या या महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकाचे आर्थिक बजेट कोसळले आहे, पण मला अशा आहे लवकरच या संकटातून आपण मुक्त होऊ, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षि शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र पुन्हा जोमाने उभा राहिल, सर्वसामान्य जनतेवरील सर्व संकटे दूर होतील.आणि महाराष्ट्र पुन्हा उभा राहील अशी प्रार्थना आपण मंगोबारायाच्या चरणी करूया असेही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शेवटी सांगितले,
या समारंभास क्रांती समुहाचे प्रमुख देवगोंडा पाटील, संजय नांदणे, दिलीप मगदूम, सरपंच अमृता पाटील, उपसरपंच यशोदा पुजारी, अशोक पुजारी, बाळासो विभुते, शंकर पुजारी, रावसाहेब विभुते, सोमा पुजारी, बाबर पुजारी, शीतल पाटील, मायाप्पा धनगर, शितल पुजारी, दत्ता पुजारी आकाराम पुजारी गणेश पुजारी, सुकुमार पुजारी, महावीर बोरगावे, अशोक बोरगावे, कोथळी ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी धनगर समाज बांधव व कोथळी मधील मान्यवर उपस्थित होते.