वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारती एअरटेलने 2015 मध्ये झालेल्या लिलावादरम्यान खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमसाठी दूरसंचार विभागाला 8,024 कोटी रुपयांचे मुदतपूर्व पेमेंट केले आहे. कंपनीने सोमवारी स्टॉक एक्सचेंजला ही माहिती देण्यात आली आहे. यावेळी कंपनीने म्हटले आहे की हप्त्यांवर 10 टक्के व्याज आकारले जात होते आणि एअरटेलने ते वेळेपूर्वी भरले आहे. 2021 मध्ये, एअरटेलने वेळेपूर्वी 15,519 कोटी रुपये भरले होते.
दरम्यान, मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने मार्च 2021 पूर्वी खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमशी संबंधित 30,791 कोटी रुपयांची संपूर्ण थकबाकी भरली होती. यामध्ये 2014-16 मध्ये खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमवर आणि 2021 मध्ये एअरटेलकडून खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमवर मिळालेल्या व्याजाचा समावेश आहे.