मुंबई :
तेल विपणन कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या डिसेंबर अखेरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून नफ्यात कंपनीने 82 टक्के घसघशीत वाढ नोंदवली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत 3181 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. याआधीच्या वर्षात समान अवधीत कंपनीने 1747 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. पण महसुल मात्र सदरच्या तिमाहीत 2 टक्के इतका घटला असून तो 1 लाख 29 हजार 984 कोटी रुपयांचा राहिला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीने 1 लाख 33 हजार 347 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केल्याची माहिती आहे. कंपनीने याच अवधीत 1 लाख 30 हजार 475 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे तर कंपनीला या अवधीत 1 लाख 26 हजार 316 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.









