आगामी 11 महिन्यात 47 टक्के लक्झरी कार येणार : इलेक्ट्रिक वाहनांवर भर राहण्याचे संकेत
नवी दिल्ली
एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी कार कंपन्यांनी आक्रमक तयारी केली आहे. पुढील 11 महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांसह 81 नवीन मॉडेल लॉन्च केले जातील. हे आर्थिक वर्ष-23मध्ये लाँच केलेल्या 54 नवीन मॉडेल्सपेक्षा 50टक्के अधिक आहे. ऑटो इंटेलिजन्स फर्म जैतो डायनॅमिक्सच्या अहवालानुसार, सुमारे 66 टक्के नवीन मॉडेल कार नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केल्या जातील. वाहन विक्रेत्यांची संघटना फाडानुसार, 31 मार्चपर्यंत आर्थिक वर्षात एकूण 36.20 लाख कार विकल्या गेल्या. कार कंपन्या उत्साहित दिसत आहेत. कारण आता सेमीकंडक्टर चिपची कमतरताही कमी राहणार आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर भर
इलेक्ट्रिक वाहन वर सरकारचा भर असणार आहे. यासोबत रेंजची चिंता नसल्याने हायब्रीड तंत्रज्ञान असलेल्या कारला मागणी आहे. त्यामुळे जास्त किमती असूनही अशा कारची विक्री होत आहे.
बीएस 6 निकषांची अंमलबजावणी
वाहन प्रदूषणासाठी नवीन बीएस6 मानदंड एप्रिलपासून देशात लागू करण्यात आले आहेत. कंपन्या यापुढे बीएस6 पहिल्या टप्प्यातील नियमांनुसार वाहने तयार करू शकत नाहीत. यात इंजिनमध्ये बदल करून संपूर्ण मॉडेल बदलण्याची रणनीती आखली जाणार असल्याची माहिती वाहन कंपन्यांनी यावेळी दिली आहे.









