हजारो जखमी, अनेक खेडी अक्षरश: भुईसपाट
वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्तान या देशात झालेल्या भीषण भूकंताच्या तडाख्यात 800 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. सहस्रावधी लोक जखमी झाले असून असंख्य खेडी पूर्णत: नष्ट झाली आहेत. इनेक इमारती कोसळल्या असून त्यांच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकलेले असल्याने मृतांची संख्या वाढण्याची चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आपत्तीवर दु:ख व्यक्त केले असून त्या देशाला शक्य तितके साहाय्य देण्याचे प्रतिपादन चीनमधून केले आहे
या भूकंपाची क्षमता रिष्टर परिमाणानुसार 6 इतकी होती. त्याची नोंद जगातील सर्व भूकंपमापन यंत्रणांनी घेतली आहे. सोमवारी सकाळी स्थानिक प्रमाणवेळेनुसार 11 वाजून 47 मिनिटांनी (भारतीय प्रमाणवेळेनुसार 12 वाजून 47 मिनिटे) भूकंपाचा प्रथम धक्का बसला. त्यानंतर काही कालावधीच्या आत आणखी हादरेही बसले. या भूकंपामुळे या देशाची अपरिमित हानी झाल्याचे वृत्त देण्यात आले आहे. या भूकांपाचे केंद्र पूर्व अफगाणिस्तानातील भूगर्भात 160 किलोमीटर खोलीवर होते. एकापाठोपाठ अनेक धक्के बसल्याने स्थावर मालमत्तेची प्रचंड हानी झाली.
तीन खेडी पूर्णत: नष्ट
या भूकांच्यात दणक्यामुळे पूर्व अफगाणिस्तानातील 3 खेडी पूर्णत। उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच इतर किमान 1000 खेड्यांमध्ये मोठी हानी झाली आहे. या देशाच्या कुनार प्रांतात या भूकंपाचा तडाखा सर्वात मोठ्या प्रमाणात बसला आहे. जास्तीत जास्त हानी याच प्रांतात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रांतात 250 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 1 हजारांहून अधिक जखमी आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
शेकडो इमारती नष्ट
अनेक इमारती धाराशायी झाल्या आहेत. भूकंपाची तीव्रता 6 रिष्टर असली, तरी तो भूगर्भात फारशा खोलवर झालेल्या नसल्याने त्याच्यामुळे हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. तथापि, पुरेशा सुविधा नसल्याने आणि औषधांचा साठा कमी असल्याने रुग्णलयांची कोंडी झाली आहे. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने अशा मर्यादित सुविधांसह डॉक्टर्स येथे काम करीत आहेत, अशीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
कच्ची बांधकामे नष्ट
भूकंपाने प्रभावित झालेल्या बहुतेक सर्व खेड्यांमधील घरांचे बांधकाम कच्चे असल्याने अनेक घरे कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट केले. अनेक लहान मुलेही घरांच्या आणि इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अडकली आहेत. बचाव कार्याला त्वरित प्रारंभ करण्यात आला असून इमारतींचे ढिगारे उपसून त्यांच्यात अडकलेल्यांना काढण्याचे काम करण्यात येत आहे. काही व्यक्तींचा जीव वाचविण्यात आला आहे. प्रशासनासमवेत स्थानिक लोकही बचावकार्यात साहाय्य करीत आहेत.
इतर देशांचे साहाय्य अद्याप नाही…
भूकंप होऊन काही तास झाल्यानंतरही अफगाणिस्तानला लागून असणाऱ्या देशांनी त्याला साहाय्य करण्याची घोषणा केली नव्हती. त्यामुळे सध्यातरी या देशाच्याच प्रशासनाने बचावकार्यासाठी कंबर कसली आहे. बचावकार्य करणाऱ्यांजवळही साधनसामग्रीची कमतरता असल्याने साहाय्यता कार्यात अडथळे येत आहेत. अफगाणिस्तानचा बहुतेक सर्व भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने तेथे नेहमी भूकंपाचे लहान-मोठे धक्के बसतात, अशी माहिती देण्यात आली.
आपत्कालीन साहाय्यतेत भारत आघाडीवर
अफगाणिस्तानच्या शेजारच्या देशांनी अद्याप साहाय्य केले नसले तरी, भारताने अफगाणिस्तानला शक्य ते सर्व साहाय्य देऊ केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपाचे वृत्त समजताच चीनमधून भारताच्या साहाय्याची घोषणा केली आहे. भारताने भूकंप झाल्यापासून 3 तासांच्या आत साहाय्यता सामग्री घेऊन भारताची विमाने अफगाणिस्तानात पोहचली आहेत. खाण्याचे कोरडे पदार्थ, औषधे, कपडे आणि तंबू इत्यादी सामग्री भारताकडून पाठविली जात आहे. 2023 मध्ये या देशात झालेल्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा भूकंप असून 2023 च्या भूकंपात किमान 4 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तो 6.3 क्षमतेचा भूकंप होता.
भूकंपात अपरिमित हानी
ड अफगाणिस्तानात दोन वर्षांममध्ये भूकंपाचे दोन मोठे धक्के, मोठी हानी
ड या भूकंपात मृतांची संख्या वाढण्याची भीती, शेकडो अडकलेल्या स्थितीत
ड भारताकडून त्वरित आपत्कालीन साहाय्यता, सामग्री घेऊन पोचली विमाने









