नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीने सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून नफ्यात दमदार म्हणजेच 80 टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदवली आहे. सदरच्या तिमाहीत कंपनीने सर्वाधिक वाहन विक्री केली असल्याचे समजते. कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीत 3716 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. जो मागच्या वर्षी याच अवधीत 2061 कोटी रुपये इतका होता. कंपनीने याच अवधीत वाहन विक्रीतून 35,535 कोटी रुपयांची प्राप्ती केली आहे. मागच्या वर्षी याच अवधीतला आकडा 28,543 कोटी रुपयांचा होता. सदरच्या बातमीनंतर मारुती सुझुकीचा समभाग शेअर बाजारात 3.20 टक्के इतका वाढत 10,759 रुपयांवर पोहचला होता.









