मागील वर्षात वाढले गुन्हय़ांचे प्रमाण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्वातंत्र्याच्या एक वर्षानंतर 1948 मध्ये देशभरातील पोलीस स्थानकांमध्ये 6 लाखांच्या आसपास गुन्हे नोंद झाले होते. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनी 2021 मध्ये 60 लाखांहून अधिक गुन्हे नोंद झलो आहेत. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशात गुन्हय़ांचे प्रमाण 10 पटीने वाढल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एनसीआरबीच्या नव्या अहवालानुसार 2021 मध्ये देशभरात 29,272 गुन्हे हत्येप्रकरणी नेंद करण्यात आले होते. म्हणजेच दरदिनी हत्येचे 80 गुन्हे घडले आहेत. 2020 च्या तुलनेत हा आकडा 0.3 टक्क्यांनी अधिक राहिला. 2020 मध्ये हत्येसंदर्भात 29,193 गुन्हे नोंद झाले होते.
हत्येमागील सर्वात मोठे कारण ‘वाद’ असल्याचे अहवालात नमूद आहे. मागील वर्षी वादामुळे 9,765 हत्या झाल्या होत्या. तर वैमनस्यातून 3,782 हत्या झाल्या आहेत. मागील वर्षी 1 लाखाहून अधिक जणांचे अपहरण झाले आहेत. तर अपहृतांमध्ये 86,543 महिलांचा समावेश होता आणि यातील 58 हजारांपेक्षा अधिक अपहृत अल्पवयीन होत्या.
देशात मागील वर्षी बलात्काराचे 31,677 गुन्हे नेंद झाले आहेत. म्हणजेच दरतासाला तीन महिलांवर बलात्कार झाला आहे. यातील 28,840 पीडिता या प्रौढ तर 3,083 पीडिता या अल्पवयीन होत्या. बलात्काराच्या प्रयत्नाचे 3,800 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. बलात्काराच्या 97 टक्के घटनांमध्ये ओळखीतील व्यक्तीच आरोपी आढळून आला आहे. तर 2,024 प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्यानेच लैंगिक शोषण केले होते. तर 15,196 प्रकरणांमध्ये आरोपी हा कौटुंबि क मित्र, शेजारी किंवा परिचित होता. तर 12,951 प्रकरणांमध्ये ऑनलाइन प्रेंड, लिव्ह-इन पार्टनर किंवा विवाहाचे आमिष देणारा आरोपी होता. 1,106 प्रकरणांमध्ये आरोपीची ओळख पटू शकली नव्हती.
एनसीआरबीचा पहिला अहवाल 1953 मध्ये समोर आला होता. एनसीआरबीच्या नव्या अहवालानुसार मागील वर्षभरात 60.96 लाख गुन्हे नोंद झाले आहेत. यातील 36.63 गुन्हे हे भादंवि अंतर्गत नोंदविले गेले. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये सुमारे 8 टक्क्यांनी कमी गुन्हे नोंद झाले आहेत.









