Vinayak Raut On Eknath Shinde : महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरु असताना महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यात उध्दव ठाकरे यांच महत्त्व वाढू लागले आहे. उध्दव ठाकरे यांनी पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यानुसार त्यांचा दौरा 9 जुलैपासून नागपूरहून सुरु होत आहे. या दौऱ्यात ते कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ज्या दिवशी अजितदादांनी तिकडे उडी मारली तेव्हापासून शिंदे गटात अस्वस्था निर्माण झाली आहे. अनेकजण पुन्हा मातोश्रीची क्षमा मागावी आणि पुन्हा शिवसेनेत जावे अस म्हणणं 8 ते 10 आमदारांच आहे. त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क साधला आहे. पण अंतिम निर्णय उध्दव ठाकरे घेतील अस स्पष्टीकरण विनायक राऊत यांनी दिलं
पुढे बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असताना सुध्दा शरद पवार ज्या जिद्दीनं, महत्वाकांक्षी विचारानं रस्त्यावर आले आहेत. हे पाहता यांना कुणी हरवू शकत नाही.पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या नेतृत्वात उभी राहू शकते असं मला वाटते.
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री रिक्षाचालक नाहीत तर टॅम्पो चालक आहेत. तो चालला तर चालला नाहीतर कोलांडला.जे मंत्री पदावर डोळा ठेवून होते, ज्यांनी मंत्रीपदासाठी कपडे शिवले होते त्यां अनेकांना कळलं आपली वर्णी लागणार नाही ते आता कोलांटी उड्या मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच काल मुख्यमंत्री यांच्या अंगावर धावून गेल्याचं समजतयं असं म्हणाले.









