मुंबई
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास 8 हजार कोटी रुपयांची शेअरबाजारातून उचल केली असल्याचे समजते. डॉलर वधारण्यासह अमेरिकेतील बाँड यिल्डमध्ये झालेली वाढ या पार्श्वभूमीवर ही उचल झाली आहे. सप्टेंबरमध्ये विदेशी गुंतवणूकदार हे पूर्णपणे विक्रीवर भर देत होते. त्या महिन्यात त्यांनी 14 हजार कोटीहून अधिक रक्कम बाजारातून काढून घेतली आहे. याआधी पाहता मार्च ते ऑगस्ट या कालावधीत 1.74 लाख कोटीची गुंतवणूक विदेशी गुंतवणूकदारांकडून झाली आहे.