10,431 कोटी रुपयांचा निव्वळ नफा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांनी सप्टेंबर 2022 अखेरच्या दुसऱया तिमाहीतील नफ्यातोटय़ाची आकडेवारी जाहीर केली आहे. या तिमाहीत 10,461 कोटी रुपयांचा निव्वळ नफा टीसीएसने कमावला आहे.
गेल्या वर्षी याच तिमाहीत टीसीएसने 9,624 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. त्यानुसार, कंपनीचा नफा याखेपेस 8.4 टक्के इतका वाढला आहे. कंपनीत 21.5टक्के प्रमाण हे कर्मचारी सोडणाऱयांचे राहिले असून तिमाहीत 9840 कर्मचारी कंपनीत सहभागी झाले आहेत. सध्या कंपनीत एकूण 6,16,171 कर्मचारी कार्यरत आहेत.
विकास 18टक्के
टीसीएसने सांगितले, की कंपनीच्या उर्वरित सेवांमध्ये 18टक्के विकासात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या 46,867 कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीच्या तुलनेत, या वर्षाच्या दुसऱया तिमाहीत 18 टक्के दराने 55,309 कोटी रुपयांची झाली.
मार्च तिमाहीत कर्मचारी सोडण्याचे प्रमाण 17.4 टक्के, जून तिमाहीत कर्मचारी सोडण्याचे प्रमाण 19.7 टक्के राहिले असून नजीकच्या काळात या प्रमाणात घट होईल असा विश्वास टीसीएसला वाटतो आहे.
8 रुपयाच्या लाभांशाची घोषणा
तिमाहीचे निकाल जाहीर करण्यासोबतच कंपनीने आपल्या भागधारकांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. टीसीएस आपल्या भागधारकांना प्रति शेअर 8 रुपये लाभांश देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









