मुंबई :
बाजारातील 10 आघाडीवरच्या कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 1,26,579.48 कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रिज आणि हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड यांच्या भांडवलात सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे. मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 973 अंकांनी म्हणजेच 1.59 टक्के इतका वधारत बंद झाला आहे. आयटीसी आणि इन्फोसिस यांच्या भांडवलात मात्र घट दिसली आहे.









