कारवार: स्विचबोर्डला लावलेले मोबाईल चार्जर ची वायर तोंडात घालून चघळल्याने ८ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कारवार जिल्ह्यातील सिद्धर तालुका येथे घडली आहे.सानिध्या संतोष कलगुटकर (वय ८ महिने ) असे मृत बालिकेचे नाव आहे. सानिध्याची आई संजना कलगुटकर या आपल्या मुलीला म्हणजेच सनिध्याला खोलीत झोपवून स्वयंपाक कामात व्यस्त होती.
इतक्यात तेथे खेळणाऱ्या बालिकेने स्विचबोर्डला लावलेल्या चार्जरचे पिन तोंडात घातले, चार्जेर मध्ये विद्युत प्रवाह चालू असल्याने बघता बघता बाळाला विद्युत झटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आई बाळाला झोपवून गेली असता त्यावेळी घरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही वेळेतच पुन्हा वीज प्रवाह सुरू झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.
कारवार ग्रामीण पोलिस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत .









