वृत्तसंस्था/ फतेहपूर
उत्तर प्रदेशात फतेहपूर येथील चिल्ला मोडजवळ एका भरधाव टँकरने चारचाकी वाहनाला धडक दिली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. घटनेनंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी जमा झाल्यामुळे महामार्गावर बरीच वाहतूक कोंडी झाली होती.
महामार्गावर समोरून येणाऱ्या टँकरने चारचाकी ऑटोला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, ऑटोतील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. चारचाकी वाहनामध्ये जवळपास 12 जण होते. या अपघातात महिला-पुऊष आणि लहान मुलांसह 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना जवळच्या ऊग्णालयात पाठवले. यासोबतच मृत लोकांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.









