लखनौ
उत्तर प्रदेशातील माफिया-राजकारणी मुख्तार अन्सारीच्या 8 कोटींच्या दोन मालमत्ता नुकत्याच गाझीपूर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दोन्ही मालमत्तांना नोटिसा लावून सील ठोकण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. अन्सारीविरुद्ध जमीन हडप, खून आणि खंडणीचे 60 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. अन्सारीनी 1996, 2002, 2007, 2012 आणि 2017 या पाच विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. अखेरच्या तीन निवडणुका तुरुंगात राहूनच लढल्यानंतरही विजय संपादन केला होता.









