वृत्तसंस्था/ मुंबई
मागच्या आठवडय़ात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1573 अंक अर्थात 2.97 टक्के वाढत बंद झाला होता. यात आघाडीवरील 10 पैकी 8 कंपन्यांनी त्यांच्या भांडवलात वृद्धीची नोंद केली आहे. 8 कंपन्यांचे बाजार भांडवल या दरम्यान 1.81 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.
कुणाचे किती भांडवल वाढले
यामध्ये आघाडीवर राहणाऱया हिंदुस्थान युनिलिव्हरने बाजार भांडवलात 50 हजार 058 कोटी रुपयांची भर घातली असून भांडवल मूल्य 5,86,422.74 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल 23,940 कोटींनी वाढून 7,75,832.15 कोटी रुपयांवर तर एलआयसीचे 19,797 कोटींनी वाढत 4,47,841.41 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. भारतीय स्टेट बँकेचे बाजार भांडवल 19,232 कोटींसह वाढून 4,35,922.66 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. इन्फोसिसचे भांडवल 15,126 कोटींनी वाढत 6,37,033.78 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
रिलायन्स नुकसानीत
वरील कंपन्या जरी भांडवल वाढवू शकल्या असल्या तरी भारतातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज मात्र मागच्या आठवडय़ात नुकसानीत होती. मागच्या आठवडय़ात रिलायन्स इंडस्ट्रीज व टीसीएसच्या बाजार भांडवलात मात्र घट दिसली आहे.









