पाली
राजस्थानच्या पालीमध्ये मुंबईहून जोधपूरच्या दिशेने जाणाऱया सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले आहेत. ही दुर्घटना सोमवारी पहाटे घडली आहे. या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या दुर्घटनेनंतर रेल्वे विभागाने मदतसामग्रीयुक्त रेल्वे घटनास्थळी रवाना केली. जयपूर येथील मुख्यालयातून मदतकार्यावर देखरेख ठेवली जात असल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.









