नवी दिल्ली
ऑनलाइन रिटेल क्षेत्रातील मोठी कंपनी अॅमेझॉन यांनी आपल्या ई-कॉमर्स निर्यात कार्यक्रमांतर्गत अॅमेझॉन ग्लोबल सेलिंगअंतर्गत 2023 मध्ये भारतातून 8 अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांची निर्यात केली असल्याची माहिती आहे. सन 2015 मध्ये अॅमेझॉन ग्लोबल सेलिंगची सुरुवात करण्यात आली आहे. इंग्लंड, कॅनडा, मेक्सिको, जर्मनी, इटली, स्पेन, हॉलंड, ब्राझील, जपान, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर यासारख्या देशांमध्ये अॅमेझॉन 18 हून अधिक आंतरराष्ट्रीय बाजारात मेड इन इंडिया उत्पादने विक्री करत आहे.









