वार्ताहर /केपे
कूपवाडा, अडणे-केपे येथील दोन घरांतील सुमारे 8 लाख 50 हजार किमतीचे दागिने चोरल्याप्रकरणी लवू पाटील व वैभव गिरी या दोन संशयितांना केपे पोलिसानी अटक केली असून त्यांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. कूपवाडा येथे गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी दोन घरांत चोरी झाली होती. यात मंग़ळसूत्र, बांगडय़ा, नेकलेस व इतर दागिने मिळून सुमारे 8 लाख 50 हजार रुपयांचे दागिने चोरल्याची तक्रार केपे पोलीस स्थानकात करण्यात आली होती. या प्रकरणी पुढील तपास केपे पोलीस करत आहेत.









