Satar News : सातारा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सातवीत शिकणारी मुलगी चार महिन्याची गरोदर असल्याचे समोर आले आहे. संबंधित मुलीवर नववीतील विद्यार्थ्याने सप्टेंबर 2022 मध्ये गोड बोलून तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला होता. झालेला प्रकार या शाळकरी मुलीने त्यावेळी कोणालाच सांगितला नव्हता.तिच्या मासिक पाळीवरुन तिची तपासणी सुरु असताना डॉक्टरांनी दिलेल्या सल्यावरुन तिची सोनोग्राफी करण्यात आली.आणि हा सर्व प्रकार समोर आला.
याबाबत तिच्या आईने शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबधित शाळकरी मुलावर पोक्सो अंतर्गत आणि 376 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला रिमांडहोममध्ये दाखल केले आहे. या घटनेतील संबधित मुलीला सध्या जिल्हा शासकिय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. हे दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकत असून इन्स्ट्राग्रामवर या दोघांची मैत्री जमली होती.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









