मंद्रूप / अभिजीत जवळकोटे :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील अप्पर तहसीलदार कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी तहसीलदार सुजित नरहरे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आमदार सुभाषबाबू देशमुख म्हणाले,“दक्षिण सोलापूर तालुका धार्मिक व पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी नागरिकांची साथ अत्यावश्यक आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास तालुक्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी मी पूर्णतः कटिबद्ध आहे.”
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंद्रूप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, गौरीशंकर मेंडगुडले, आर. के. कन्स्ट्रक्शनचे मोतीराम राठोड, शिवाजी बाळासाहेब चव्हाण, निंबर्गी गावाचे पोलीस पाटील सिद्धाराम बिराजदार, सचिन फडतरे, यतीन शहा, नितीन रनखांबे, बरूरच्या सरपंच शोभाताई टेळे, चनगोंडा हाविनाळे, विश्वनाथ हिरेमठ, भारत बिराजदार, प्रशांत कडते, कासीम शेख, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि मंद्रूप परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








