आतापर्यंत 229 अर्ज दाखल : आज शेवटचा दिवस
बेळगाव ; विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 18 मतदारसंघांमध्ये एकूण 79 अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 229 अर्ज दाखल झाले असून गुरुवारी शेवटचा दिवस असल्यामुळे आणखी अर्ज दाखल होणार आहेत. म. ए. समितीच्यावतीने ग्रामीण मतदारसंघातून आर. एम. चौगुले यांनी बुधवारी शक्तिप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर इतर उमेदवारांनीही शक्तिप्रदर्शन करतच अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी निपाणी मतदारसंघातून 2 उमेदवारी अर्ज, चिकोडी मतदारसंघातून 4, अथणी 4, कागवाड 4, कुडची 3, रायबाग 6, हुक्केरी 3, अरभावी 6, गोकाक 5, यमकनमर्डी 4, बेळगाव उत्तर 4, बेळगाव दक्षिण 3, बेळगाव ग्रामीण 4, खानापूर 5, कित्तूर 5, बैलहोंगल 5, सौंदत्ती 3, रामदुर्ग मतदारसंघातून 9 अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील 18 मतदारसंघांतून एकूण 79 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये 71 पुरुष व महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत 229 अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी शेवटचा दिवस असल्यामुळे त्यानंतरच एकूण अर्जांची संख्या स्पष्ट होणार आहे.









