कोल्हापूर :
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी जिह्यातील विविध ठिकाणी नागरीक एकत्रीत आले होते. त्याच्या सुरक्षितेसाठी कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरासह जिह्यातील महत्वाच्या ठिकाणाबरोबर रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या 788 पोलिसांनी रस्त्यावरच सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षाचे स्वागत केले.
बंदोबस्तासाठी 1 पोलीस अधीक्षक, 1 अपर पोलीस अधीक्षक, 6 पोलीस उपअधीक्षक, 80 पोलीस अधिकारी व 700 पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच जिह्यात शहर वाहतुक नियंत्रण वाहतुक व स्थानिक पोलीस ठाण्याच्या संयुक्तपणे महत्वाच्या 50 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
तसेच थर्डी फस्टच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह जिल्हा ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. या दरम्यान महाराष्ट्र पोलीस कायदा, भारतीय न्याय संहिता, अंमली पदार्थ विरोधी कायदा, भारतीय नागरी सुरक्षा संहिता तसेच मोटार वाहन कायदा अशा विविध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. याबरोबर पोलीस अभिलेखावरील पाहिजे व फरारी असलेले आरोपी, गुंड, हद्दपार (तडीपार) गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर यांचा कसुन शोध घेण्यात आला.
मैदानावर सध्या वेषातील पोलीस बंदोबस्त
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी होणाऱ्या बस स्थानके, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा आणि नववर्ष स्वागत कार्यक्रमांच्या ठिकाणे, निर्जनस्थळे, खुली मैदाने, अशा ठिकाणी साधा वेषातील पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली होती. तसेच महिला, तऊणीची छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक पोलीस उपाधीक्षक विभागाच्या हद्दीत निर्भया पथकाकडून गस्ती घालण्यात आली होती. त्यामुळे कोठेही छेडछाडीचा प्रकार घडला नाही. त्याचबरोबर भरारी पथकाकडून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्याऱ्या हुल्लडबाजांबर नजर ठेवण्यासाठी व कारवाई करण्यात येत होती. रात्री उशिरापर्यंत किती जणाविरोधी कारवाई केली यांची माहिती मिळू शकली नाही.
ब्रेथ अॅनालायझर मशिनने तपासणी
कोल्हापूर व इचलकरंजी शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांच्याकडून मंगळवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजल्यापासून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या चालकाची ब्रेथ अॅनालायझर मशिनने तपासणी कऊन, वाहन चालक दाऊ पिऊन वाहन चालवित होता की नाही याची तपासणी केली जात होती. दाऊ पिऊन किती वाहन चालकाविरोधी कारवाई केली आहे. याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही. तसेच नववर्षाच्या स्वागता वेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. यावेळी ध्वनी व वायु प्रदुषण, न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही. याची पोलिसांच्याकडून दक्षता घेण्यात आली होती.








