ऑनलाईन टीम / कॅलिफोर्निया :
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात हेलिकॉप्टर कोसळून प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ब्रायंटच्या 13 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. त्याच्या अपघाती निधनामुळे बास्केटबॉल प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोबे ब्रायंट हेलिकॉप्टरने प्रवास करत असताना हवेतच हेलिकॉप्टरला आग लागली. त्यामुळे हे हेलिकॉप्टर एका झुडपात कोसळले. झुडपालाही आग लागल्याने बचाव पथकाला अनेक अडचणींचा समाना करावा लागला. या अपघातात कोणालाही वाचू शकले नाही. लॉस एंजलिसपासून 65 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर कोबी ब्रायंट यांच्या मालकीचे होते. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
कोबे ब्रायंट हा तब्बल 20 वर्षे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये सक्रिय होता. ब्लॅक मांबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोबेने पाचवेळा संघाला एनबीए चॅम्पियनशीप मिळवून दिली होती.









