प्रतिनिधी,खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे-माळवाडी येथे टँकरखाली चिररडून 75 वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. सावित्री धोंडू कालेकर असे मृत वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी टँकरालक प्रसन्न गजानन पटवर्धन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टँकरचालक प्रसन्न पटवर्धन हा आपल्या ताब्यातील एम.एच.43/वाय 2605 क्रमांक 10 चाकी पाण्याचा टँकर लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामध्ये रिकामा करून पुन्हा घराकडे येत होता. यादरम्यान 75 वर्षीय वृद्धा रस्त्याने येत होती. अंतर्गत रस्ता अरूंद असल्याने दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहनांना बाजु मिळणे अवघड होते. ही वृद्धा चालत असताना बाजू काढून टँकरालक पुढे गेला यावेळी समोरून आलेल्या कारला जागा देण्यासाठी चालकाने टँकर बाजुला थांबवला.
यादरम्यान, वृद्धा टँकराच्या डाव्या बाजुने चालत पुढे आली.ही बाब टँकरचालकाच्या लक्षात न आल्याने धक्का लागून खाली पडली.यावेळी तिच्या अंगावरून पुढे चाक गेल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. अपघातचे वृत्त कळताच नजिकचे ग्रामस्थ घटनास्थळी पोहाचले. लोटे येथील पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक हर्षल हिंगे, पोलीस कॉन्स्टेबल येलकर, पडळकर घटनास्थळी दाखल झाले. वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकरालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









