निलावडे येथे शॉर्टसर्किटने आग : फळ झाडांसह शेती अवजारे आगाया भक्ष्यस्थानी ः तीस लाखाचे नुकसान
खानापूर/प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील निलावडे येथे शॉर्टसर्किटने आग लागल्याने निलावडे येथील जवळपास 75 एकरातील ऊस आगीत खाक झाला. यामध्ये फळझाडांसह गवत गंजी, शेतातील पाणीपुरवठय़ाचे पाईप व इतर शेती अवजारे आगाया भक्ष्यस्थानी पडले असून जवळपास तीस लाखाचे शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात गेल्या आठवडय़ाभरात सात ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी असोगा, शेडेगाळी, लोंढा, होनकल, इदलहोंड, रूमेवाडी या ठिकाणी आग लागून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच शनिवारी दुपारी बारा वाजता निलावडे येथे शॉर्टसर्किटने शेतात ठिणगी पडल्याने तेथे असलेल्या गवतगंजींनी पेट घेतला. बाजूला असलेल्या उसालाही आग लागल्याने शेतातील फळझाडांनी पेट घेतला.
यात निलावडे येथील शेतकरी नारायण दळवी, दिनकर देसाई, संभाजी दळवी, पुंडलिक उसगावकर, हनुमंत उसगावकर, बाबुराव गुरव, अर्जुन देसाई या शेतकयांचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी शेतकरी व गावकऱयांनी प्रयत्न केले. तसेच अग्निग्नशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र अग्निग्नशमन दलाची वाहने पोहोचेपर्यंत शेतकऱयांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
त्यानंतर अग्निग्नशामक दलाने ही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आग आटोक्यात आली. अग्निग्नशामक दलाचे जवान आज विझवत असतानाच पुन्हा टीसीजवळील विद्युतवाहिनीतून शॉर्टसर्किट होऊन मोठय़ा प्रमाणात ठिणग्या पडत होत्या. त्यामुळे अग्निग्नशामको जवान जवळ बराच वेळ त्या ठिकाणी तळ ठोकून होते. आगीत सुमारे 75 एकरावरील काजू, चिकू, आंबा, केळी तसेच शेतात पाणीपुरवठा करण्यात येणारी प्लास्टिक पाईप आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. या ठिकाणी तलाठी, ग्रामपंचायती सदस्य विनायक मुणगेकर, मधु कोरेकर यांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले.








