दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी अनगोळ येथे संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत ७४ वा प्रजासत्ताक दिन आणि संपूर्ण राष्ट्रगान अभियान उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण राष्ट्रगान अभियांतर्गत राष्ट्रगीत गायले गेले. आणि शाळेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्रीमती अलकाताई इनामदार, श्री किशोर काकडे व मेजर दीपचंद्र सिंह उपस्थित होते. तसेच शाळेचे अध्यक्ष श्री परमेश्वर हेगडे, शाळेचे सेक्रेटरी श्री सुधीर गाडगीळ, प्रशासक श्री राघवेंद्र कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता दफ्तरदार, उपमुख्याध्यापिका श्रीमती ऋतुजा जाधव, शाळेचे व्यवस्थापन सदस्य, जनकल्याण संस्थेचे सदस्य व पालक वर्ग उपस्थित होते.
पुढील कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील मुलींच्या संस्कृत समूहगीताने झाली. पृथ्वीराज शिंदे व गौसीया माडीवाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेजर दीपचंद्र सिंह व त्यांची कमांडो टीम या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
२५० स्वातंत्र्यवीरांचे मुलांनी रेखाटलेले चित्रांच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला.
प्रमुख पाहुण्या श्रीमती अलकाताई इनामदार यांनी देशाच्या हितासाठी जगता आलं पाहिजे हे आपल्या शब्दातून उपस्थितीला पटवून दिले. व्यवस्थापक श्री किशोर काकडे यांनी मधुर गाण्यातून उपस्थितांना संदेश दिला. मेजर दीपचंद्र सिंह यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे अध्यक्ष श्री परमेश्वर हेगडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दृष्टी धन्ना, अदिती हिरेमठ आणि साहिल गुडेकर याने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









