आतापर्यंत 2 हजार 203 घरे मंजूर : अजूनही मंजूर करण्यासाठी हवी धडपड
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव तालुक्मयासह जिल्हय़ात वसती योजनेंतर्गत अनेक घरे मंजूर झाली आहेत. बेळगाव तालुक्मयासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसती योजनेतून 528 तर बसव वसती योजनेतून 1 हजार 675 घरे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र निधी कमी येत असल्यानेही अजूनही काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अजून तालुक्मयातील दोन्ही वसती योजनेतून 711 घरे मंजूर करणे बाकी आहे. त्यामुळे ज्यांनी अर्ज केले आहेत. त्यांना घरे मंजूर करावीत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, आता ग्राम पंचायतीच्या माध्यमातून 1 हजार 478 घरांना मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. यामधील ग्राम पंचायतीमध्ये 276 घरे तालुका पंचायतीकडे मंजुरीसाठी पाठवायची आहेत, तर तालुका पंचायतमधून 730 घरे जिल्हा पंचायतीला पाठवायची असून जिल्हा पंचायतीकडून 711 घरे मंजूर करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठवायची आहेत. त्यामुळे आता अजूनही घरे मंजूर होण्यास उशीर आहे.
अनेक घरांची कामे रेंगाळली
तालुक्यात विविध वसती योजनेंतर्गत अनेक घरांची कामे रेंगाळली आहेत. 2016 पासूनची घरे अजूनही बांधण्यात आली नाहीत. तर बेळगाव तालुक्मयासाठी 2021-22 सालासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बसव वसती योजनेंतर्गत 2 हजार 203 घरे मंजूर झाली आहेत. विविध वसती योजनेंतर्गत हजारो घरे मंजूर झाली असून त्यामधील केवळ मोजक्मयाच घरांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अनेकजण इच्छुक असूनही त्यांचे अर्ज मात्र धूळखात पडत आहेत. निधीअभावी घरे बांधणेही कठीण होत आहे. त्यामुळे आता निधीत वाढ करावी, अशी मागणी होत आहे. विशेष करून काहींना घरे मंजूर करण्यात आली असली तरी सरकारकडून निधी देण्यात येत नसल्याने समस्याही निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेकांची घरे अर्धवट राहिली आहेत. तेंव्हा याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी
बऱयाच ग्राम पंचायतीमधून ग्रामसभा घेऊन घरे मंजूर करण्यात आली आहेत. तर अनेक ग्राम पंचायतींमध्ये राजकारणांमुळे घरे मंजूर करण्याकडे दुर्लक्ष झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र इच्छुकांना व गरिबांना यापासून मुकावे लागत आहे. दरम्यान, अशीच परिस्थिती राहू नये यासाठी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन इच्छुकांना घरे मंजूर करण्याची मागणी होत आहे.









