नववर्षाची सुरुवात उज्ज्वल भविष्याच्या दिशेने ः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रोजगार मेळाव्याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता देशाला व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित केले. याप्रसंगी पंतप्रधानांनी सरकारी सेवेमध्ये नव्याने भरती झालेल्या 71,000 जणांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले. तसेच विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये सहभागी झालेल्यांचे अभिनंदन केले. येत्या काही दिवसांत आणखी लाखो उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यानंतर अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार असल्याचे स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले. पश्चिम बंगालमधील सुप्रभा बिस्वास हिला पीएनबीमध्ये नोकरी मिळाली. तिच्याशी पंतप्रधानांनी थेट संवाद साधला. यावेळी आपले वडील मजूर आणि आई गृहिणी असल्याचे सांगत या नियुक्तीमुळे आपल्या कुटुंबाला मोठी आर्थिक मदत होणार असल्याचे तिने स्पष्ट पेले. गेल्यावषी दोन रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांनी 1 लाख 47 हजार बेरोजगारांना नियुक्तीपत्रे दिली होती. 2022 मध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पंतप्रधानांनी केंद्रीय स्तरावर रोजगार मेळाव्याची सुरुवात केली. केंद्रीय स्तरावर 10 लाख नोकऱया देण्याच्या सरकारच्या मोहिमेची ही सुरुवात होती. त्यानंतर पंतप्रधानांनी गुजरात, जम्मू आणि काश्मीर आणि महाराष्ट्र सरकारच्या रोजगार मेळय़ांना संबोधित केले आहे.

2023 या नव्या वर्षातील हा पहिला रोजगार मेळावा आहे. नवीन वर्षाची सुरुवात उज्ज्वल भविष्याच्या नव्या दिशेने झाली आहे. रोजगार मेळाव्यातून रोजगार मिळालेल्या तरुणांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मी अभिनंदन करतो. येत्या काही दिवसांत आणखी लाखो कुटुंबांना सरकारी नोकऱयांमध्ये नियुक्ती मिळणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. रोजगार मेळावे हे आमच्या सुशासनाचे वैशिष्टय़ बनले आहे. आमच्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा हा पुरावा आहे. यासोबतच आज नियुक्तीपत्र मिळालेल्यांसाठी हा आयुष्याचा नवा प्रवास असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
या पदांची भरती…
देशभरातून निवडलेल्या नवीन भरतीमध्ये कनि÷ अभियंता, लोको पायलट, तंत्रज्ञ, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, लघुलेखक, कनि÷ लेखापाल, ग्रामीण डाक सेवक, प्राप्तिकर निरीक्षक, शिक्षक, डॉक्टर, परिचारिका, सामाजिक सुरक्षा अधिकारी, पीए, एमटीएससारख्या विविध पदांच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. सरकारने विविध सरकारी विभागांमधील सर्व नवीन भरतीसाठी ऑनलाईन अभिमुखता अभ्यासक्रमांसाठी कर्मयोगी प्रभात मॉडय़ूलदेखील सुरू केले आहे. या प्रणालीवर नवीन नियुक्त्या मिळालेल्यांना अभिप्राय पाठविण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
10 लाख नोकऱया देण्याची मोहीम
10 लाख लोकांना रोजगार देण्यासाठी पंतप्रधानांनी गेल्यावषी ‘रोजगार मेळा’ सुरू केला होता. बेरोजगारीच्या मुद्दय़ावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना पंतप्रधानांनी गेल्या आठ वर्षांत नोकऱया निर्माण करण्यासाठी सरकारचे केलेले प्रयत्न अधोरेखित केले. पहिल्या टप्प्यात विविध सरकारी नोकऱयांसाठी 75,000 हून अधिक लोकांना नियुक्तीपत्रे दिल्यानंतर आपल्या भाषणात पंतप्रधानांनी विक्रमी महागाई आणि बेरोजगारीमुळे प्रभावित अनेक देशांसह जगभरातील अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांची कबुली दिली.









