सीईसीचा भारतासंबंधी अहवाल
सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरमेंटच्या (सीएसई) ‘स्टेट ऑफ द इंडियाज इनव्हायरमेंट’ अहवालानुसार आहारात फळ, भाज्या आणि धान्याची कमतरता तसेच प्रक्रियाकृत मांस, रेड मीट आणि शुगर डिंक्सच्या अतिरेकामुळे आजार वाढत आहेत. सकस आहाराचा अभाव व्यक्ती अंडरवेट (कमी वजन) आणि ओव्हरवेट (अधिक वजन) होण्याचे मोठे कारण ठरत आहे.
जगभरात 42 टक्के लोकसंख्या सकस आहार मिळवू शकत नाही. तर भारतात 71 टक्के लोक सकस आहार प्राप्त करण्यास असमर्थ आहेत. यामुळे वर्षाला 17 लाखांहून अधिक लोकांचा डायट रिस्कशी निगडित आजार म्हणजेच मधूमेह, श्वसनरोग, कर्करोग आणि हृदयविकारामुळे मृत्यू होतो.
ग्रीनहाउस वायूंचे उत्सर्जन
अहवालानुसार अन्नव्यवस्था आणि पद्धतींचा पर्यावरणावर प्रभाव पडतो. ग्रीनहाउस गॅसांच्या (हरितवायू) उत्सर्जनात सर्वात मोठे योगदान दूध उत्पादनाचे आहे. तसेच धान्योत्पादनात सर्वाधिक पाणी, नायट्रोजन आणि फॉस्फरसचा वापर होत आहे.
गावांमध्ये महागाई अधिक
अहवालात आहाराच्या किंमतींचेही विश्लेषण करण्यात आले आहे. मार्च 2021 ते एप्रिल 2022 दरम्यान पश्चिम बंगाल, हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, आसाम, उत्तरप्रदेश, ओडिशा, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीर, गुजरात, झारखंड, उत्तराखंड, तामिळनाडू, आंध्रप्रदेशात शहरांच्या तुलनेत गावांमध्ये आहाराच्या किमतीत अधिक वाढ झाली. तर बिहार, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत शहरांमध्ये महागाई अधिक राहिली. देशाने अन्नधान्य क्षेत्रात प्रगती केली असली तरीही आहार सकस मिळत नाही.