वार्ताहर /कागवाड
सांगली जिह्यातून कर्नाटकामध्ये कोणतीही कागदपत्रे नसतानाही कारमधून 70 लाख ऊपये घेऊन जाणाऱ्या गाडीतील रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई कागवाड तपासणी नाक्यावर सोमवारी सायंकाळी करण्यात आली आहे. मिरज तालुक्मयातील मालगाव येथून 70 लाखांची रोकड कार क्र. एमएच 47 एएस 0277 मधून अमित वसंत शेळके (रा. मालगाव, ता. मिरज), अनिल ऊद्रप्पा जंगम (रा. एरंडोली, ता. मिरज) जात होते. कागवाड येथील तपासणी नाक्यावर सदर कारची तपासणी केली असता त्यात सदर रक्कम अधिकाऱ्यांना सापडली. याविषयी कार चालकाकडे चौकशी केली असता, त्याविषयी कोणतीच कागदपत्रे सादर केली नसल्याने सदर रक्कम जप्त करण्यात आली.









