सीईएन पोलीस विभागाची कारवाई : संशयितांकडून 2 लाख रुपये, 70 मोबाईल जप्त
बेळगाव : बैलहोंगल येथील एका जुगारी अ•dयावर छापा टाकण्यात आला आहे. जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून या छाप्यात 70 जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याजवळून 2 लाख रुपये आणि 70 मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे. बैलहोंगल येथील संस्कृत बार अँड रेस्टॉरंट येथील एका क्लबशेजारी मोठ्या प्रमाणात अंदर-बाहर जुगार सुरू होता. याची माहिती जिल्हा सीईएन विभागाला मिळताच जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली अचानक छापा टाकून 70 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. पहिल्या मजल्यावर हा जुगार सुरू होता, अशी माहिती मिळाली आहे.
अटक करण्यात आलेल्या सर्व 70 जणांना पोलीस दलाच्या दोन बसमधून रात्री बेळगावला आणण्यात आले आहे. कोर्ट कंपाऊंडमधील सीईएन विभागाच्या कार्यालयात सर्व 70 जणांना आणून त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. स्थानिक पोलिसांना या जुगारी अ•dयाची माहिती मिळाली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, बेळगाव शहर व उपनगरातही मोठ्या प्रमाणात जुगारी अ•s सुरू आहेत. स्थानिक पोलीस अधूनमधून कारवाई केल्याचा फार्स करत असतात. दसरा आणि दिवाळी दरम्यान तर जुगारी अ•dयांची संख्या आणि त्या अ•dयांमध्ये होणारी उलाढाल वाढते. साहजिकच पोलिसांची बिदागीही वाढते. बेळगाव शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अ•dयांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









