बालपणीच निवृत्तीनंतरचे नियोजन
शिकण्यासाठी अत्यंत कमी वय मानले जाणाऱया वयात एक मुलगा स्वतःचा व्यवसाय चालवत आहे. फॅशन क्लोदिंग लाइनचा बिझनेस सुरू करणाऱया या मुलाचे नाव हंटर कर्टिस असून तो कमी वयातच कपडय़ांचा व्यवसाय करत आहे. स्वतःच्या आईच्या मदतीने 7 वर्षीय हंटर स्वतःच्या वयाच्या मुलांसाठी कपडे डिझाइन करत असून त्यांना सोशल मीडियावर ब्रँड देखील करत आहे.
ऑस्ट्रेलियात राहणारा हंटर एका समृद्ध कुटुंबाचा सदस्य आहे. या वयात तो खेळू-बागडू शकतो, पण त्याने मेहनत करून स्वतःचा व्यवसाय चालविण्यास सुरुवात केली आहे. त्याने स्ट्रीटवियर कपडय़ांचा व्यवसाय सुरू केला आहे.
हंटरच्या ब्रँडचे नाव ‘एचपीसीब्रँड’ असून यांतर्गत तो मुलांसाठी कपडे तयार करतो, तसेच सोबत परिधान करण्यात येणाऱया सामग्री देखील निर्माण करतो. या व्यवसायाच्या अंतर्गत त्याने कपडय़ांची पूर्ण सीरिज सादर केली असून त्याला एचपीसीब्रँड नावाने इन्स्टाग्रमा अकौंटने शेअर देखील केले आहे.
हंटर स्वतःच्या घरात एकटय़ाने व्यवसाय करत नाही, तर त्याची 10 वर्षीय बहिण पिक्सी कर्टिसने देखील कमी वयात स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे आणि ती कोटय़वधींची मालकीण आहे. तिची पिक्सीज फिगेट्स नावाची एक कंपनी असून त्याद्वारे ती कोटय़वधींची कमाई करत आहे. या कामात आई रॉक्सी देखील दोन्ही मुलांना मदत करते. रॉक्सी या स्वतःच एक यशस्वी पब्लिक रिलेशन्स मॅनेजर आहेत.
आई रॉक्सी आणि मुलगी पिक्सीने मे महिन्यात खेळण्यांचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांची सर्व खेळणी केवळ 48 तासांमध्येच विकली गेली आणि हे त्यांचे पहिले यश होते. कंपनीची पहिल्या महिन्याची उलाढाल 2 लाख डॉलर्स म्हणजेच एक कोटी रुपयांहून अधिक होती. त्यानंतर पिक्सीच्या कंपनीकडून हेअर एसेसरी ब्रँडही तयार करण्यात आला, ज्याचे नाव पिक्सीज बोउज ठेवण्यात आले.









