घेत नाही सुटी, बिझी राहण्याची आवड
नोकरदार लोक सुट्यांसाठी व्याकुळ असतात. वीकेंडनंतरच्या सुटीचा दिवस त्यांच्या आवडीचा असतो. तर दुसरीकडे एका युवतीने 7 नोकऱ्या एकत्र करत स्वत:ची मेहनती वृत्ती दाखवून दिली आहे. मला बिझी राहण्याची सवय असल्याचे या युवतीचे सांगणे आहे.
21 वर्षीय वुडरोफ सध्या एक प्रोफेशनल डान्स प्रशिक्षक, बेकर, इन्फ्लुएंसर, बरिस्ता आणि बेबीसिटर म्हणून काम करते. ती बोट ट्रिप टूर देखील करते आणि सबवेमध्ये काम करते. तिचा स्वत:च्या बिझी शेड्यूलला लवकर कमी करण्याचा कुठलाच विचार नाही.
कधीकधी आठवड्यातील सातही दिवस काम करून डर्बीची क्लो स्वत:च्या सर्व नोकऱ्यांद्वारे दर महिन्याला 1800 पाउंड कमावते. आठवड्यातील सर्व दिवस आणि विकेंडमध्ये काम करण्याची पद्धत मला पसंत आहे. नृत्य नेहमीच माझे पहिले प्रेम राहिले आहे. परंतु मला बिझी शेड्यूलही पसंत असल्याचे क्लो सांगते.
तिने जुलै महिन्यात मँचेस्टरच्या नॉर्दर्न बॅले स्कूलमधून ग्रॅज्युएटची उपाधी प्राप्त केली आणि तिचा विकेंड डान्स आणि शिक्षण दोन्हींसाठी समर्पित आहे. परंतु ती जेव्हा नृत्य करत नसते, तेव्हा ती स्वत:चा पार्ट टाइम जॉब किंवा बेकिंग यापैकी एक काम करत असते. बेकिंग माझ्यासाठी एक रचनात्मक आउटलेट आहे. मला नव्या रेसिपीसोबत प्रयोग करणे आणि त्या इतरांसोबत शेअर करणे पसंत असल्याचे तिने सांगितले आहे.
सामान्य दिवशी ती सकाळी लवकर उठून ऑर्डनुसार केक तयार करते, मग सबवे किंवा बो स्ट्रीट कॅफे नावाच्या स्थानिक फूड हॉन्टमध्ये स्वत:ची शिफ्ट सुरू करते. वीकेंडमध्ये ती नृत्याचे धडे देते किंवा मुलांची देखभाल करण्याचे काम करते. क्लोने आता एक नवा व्यवसायही सुरु केला आहे. तिने अलिकडेच एक नॅरोबोट खरेदी केले असून त्याचे नुतनीकरणही ती करत आहे. लवकरच स्वत:च्या आईवडिलांच्या घरातून यात स्थलांतर करण्याची तिची योजना आहे. क्लो सोशल मीडिया चॅनेल्सवर स्वत:च्या व्यग्र दैनंदिन जीवनाचा तपशील शेअर करते.