वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका इसमाने शाळेत गेलेल्या 7 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले आहे. आरोपी एका खासगी शाळेत पोहोचून तेथील शौचालयात शिरला होता. तेथे त्याने एका 7 वर्षीय मुलीला पकडून तिचे लैंगिक शोषण केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पीडित विद्यार्थिनीने या घटनेची माहिती स्वत:च्या आईला दिली होती. यानंतर पीडितेच्या आईवडिलांनी शाळेच्या प्रशासनाला याची माहिती दिली. या माहितीच्या आधारावर गांधीनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने शाळेची सुरक्षाभिंत ओलांडून पळ काढला होता. आरोपीने स्वत:चा गुन्हा मान्य केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.









