चालू आर्थिक वर्षात ध्येय प्राप्त करण्याचे संकेत
नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षात औषध उद्योगाच्या महसुलात 7-9 टक्क्यानी वाढ होण्याची शक्यता आहे. असा अंदाज रेटिंग एजन्सी क्रिसिल यांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षात महसूल वृद्धी म्हणावी तशी साध्य करता आलेली नाही.
यामध्ये नफा कमाईत चालू आर्थिक वर्षात दोन ते अडीच टक्क्यांनी घट होणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर याच दरम्यान 1.30 टक्क्यांनी ही घट होणार असल्याचे संकेत आहे. 184 औषध निर्मिती करणाऱया कंपन्यांच्या संशोधनावर आधारीत हा अंदाज सादर केला आहे. या कंपन्यांचा 3.4 लाख कोटी रुपयांसह देशातील औषध उद्योगामध्ये 55 टक्के हिस्सा राहणार असल्याचीही शक्यता व्यक्त केली आहे.









