मुंबई
बांधकाम क्षेत्रात लक्झरी प्रकल्पांप्रती अधिक रस घेणारी कंपनी सनटेक रिअल्टी लिमिटेडला आगामी काळात विविध प्रकल्प राबवायचे आहेत. याकरीता कंपनीने 7 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना निश्चित केली आहे. सदरचे प्रकल्प हे आगामी 7 ते 8 वर्षात टप्याटप्याने उभारले जाणार असून गेल्या 2 वर्षाच्या अवधीत कंपनीने मुंबईत 25.5 दशलक्ष चौ. फू. इतकी जागा खरेदी केली असल्याची माहिती आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला 400 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी कंपनीने केली आहे.








