३ मार्च रोजी दहावीच्या गणित विषयाच्या परीक्षेदरम्यान निष्काळजीपणा केल्याने संबंधित ७ शिक्षकांवर शिक्षण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी कारवाई केली आहे.
अतिरिक्त आयुक्त शाळा शिक्षण विभाग धारवाड यांनी कर्नाटक माध्यमिक शाळा हिरेबागेवाडी येथील परीक्षा केंद्राला भेट दिली असता
परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना न तपासता प्रवेश देऊन, परीक्षा कक्षामध्ये कॉपी करण्यास अनुमती, परीक्षा कक्षेच्या पाठीमागे जनतेला वावरण्यास मज्जाव केला नाही या सर्व गोष्टी शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले. परीक्षा केंद्राचे मुख्याधिकारी आणि पर्यवेक्षकांनी सादर केलेल्या अहवालानुसार दखल घेत ही कारवाई करण्यात आली असून संबंधित ७ शिक्षकांना निलंबित करून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
दोषी आढळलेले शिक्षक एस एस करविनकोप्प, वि एस बिळगी, एल आर. महाजनशेट्टी, एम एस अक्की, ए एच पाटील, एन एम नंदिहळ्ळी आणि एस सी धुळाप्पनवर या शिक्षकांवर कर्नाटक सरकारी कर्मचारी सेवा अधिनियम १९५७ ( १० ) च्या अनुसारे उपसंचालक शाळा शिक्षण विभाग बेळगांव यांनी निलंबित करण्याचाआदेश दिला आहे.
Previous Articleवडगाव रस्ताकामामुळे वाहन पडले अडकून
Next Article प्लास्टिक नूडल्स विक्री करणाऱ्या कंपनीला दणका









