वृत्तसंस्था/ तेहरान
इराणने शनिवारी सहा कैद्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. देशाच्या तेल-समृद्ध नैर्त्रुत्य प्रदेशात इस्रायलसाठी हल्ले करण्यात मदत केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने ते दोषी ठरले होते. सदर आरोपींनी पोलीस अधिकारी आणि सुरक्षा दलातील जवानांची हत्या केली होती. तसेच इराणच्या अशांत खुझेस्तान प्रांतातील खोरमशहरच्या आसपासच्या लक्ष्यांवर बॉम्बस्फोट करण्याची योजना आखली होती. यावर्षी इराणमध्ये फाशीच्या संख्येत वाढ झाली असून ती चालू दशकांमध्ये सर्वाधिक असल्याचे मानले जाते. जूनमध्ये झालेल्या 12 दिवसांच्या इराण-इस्रायल युद्धानंतर ही फाशी देण्यात आली आहे.









