इंफाळ
सुरक्षा दलांनी इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्dयांमधून विविध प्रतिबंधित संघटनांच्या 7 उग्रवाद्यांना अटक केली आहे. खंडणी गोळा करणाऱ्या युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (पी) च्या तीन उग्रवाद्यांना इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील आरआयएमएस रुग्णालयातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. इंफाळ पूर्व जिल्ह्याच्या खोंगमपट येथून प्रतिबंधित पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एका सक्रीय सदस्याला अटक करण्यात आली. प्रतिबंधित कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीच्या एका सदस्याला इंफाळ पूर्व जिल्ह्याच्या चेकसाबी येथून ताब्यात घेण्यात आले. तर फकनंग संगोमसांग येथून एका उग्रवाद्याला अटक करण्यात आली आहे.









