158 कोटींचे दावे : पहिल्या टप्प्यात 4 कोटी गुंतवणूकदारांना परतावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सहारा को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 7 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांनी ‘सीआरसीएस-सहारा रिफंड पोर्टल’ वर परतावा मिळण्यासाठी सुमारे 158 कोटी रुपयांचा दावा केला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी 18 जुलै रोजी सीआरसीएस-सहारा रिफंड पोर्टल लाँच केले.
सुरुवातीला या पोर्टलच्या माध्यमातून सहाराच्या 4 सोसायट्यांच्या समूहातील 10 कोटी गुंतवणूकदारांना 5 हजार कोटी रुपयांचा परतावा देण्याचे बोलले जात होते. या सोसायट्यांनी गुंतवणूकदारांकडून 86,000 कोटींहून अधिक रक्कम उभारली होती.
नोंदणीनंतर 45 दिवसांच्याआत परतावा
सीआरसीएस पोर्टलच्या लॉन्च प्रसंगी शहा म्हणाले की, सहाराच्या गुंतवणूकदारांना या पोर्टलद्वारे अर्ज केल्यानंतर 45 दिवसांच्या आत त्यांचे पैसे परत मिळतील. हे पैसे थेट खात्यात हस्तांतरित केले जातील. सहाराच्या 4 सहकारी संस्थांचे गुंतवणूकदार पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. गुंतवणूकदारांमध्ये बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांतील लोकांची संख्या सर्वाधिक आहे.
फक्त 10,000 रुपये परत केले जातील
ठेवीदारांना पहिल्या टप्प्यात 10,000 रुपयांपर्यंतचा परतावा मिळणार आहे. शहा म्हणाले की, पहिल्या टप्प्यात एकूण 4 कोटी गुंतवणूकदारांना पैसे परत केले जातील. 5000 कोटींचा परतावा दिल्यानंतर, आम्ही सर्वोच्च न्यायालयाशी संपर्क साधू आणि त्यांना आणखी निधी जारी करण्याची विनंती करू जेणेकरून 10,000 पेक्षा जास्त गुंतवणूकदारांना पूर्ण पैसे परत करता येतील.
स्टार्स मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हैदराबादचे गुंतवणूकदार 29 मार्च 2023 पूर्वी अर्ज करू शकतात.









